चित्रनगरी इतिहास

"उत्कृष्टता म्हणजे नेहमीच्या गोष्टी असामान्य पद्धतीने पार पाडणे." – दादासाहेब फाळके

चित्रनगरीला गर्व आहे की,  १९ व्या शतकाच्या अखेरच्या काळात सुरू झालेल्या भारतीय सिनेमाचा समृद्ध वारसा लाभला आहे.



१८९६

१८९६

    • ल्युमियर बंधूंनी वॉटसन हॉटेलमध्ये सहा मूकपट प्रदर्शित केले ; ज्यामुळे भारतीय सिनेमा जन्माला आला.
१९१३

१९१३

    • भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक आणि दिग्गज चित्रपटनिर्माते स्वर्गीय श्री. दादासाहेब फाळके यांनी भारताचा पहिला पूर्ण लांबीचा चित्रपट 'राजा हरिश्चंद्र' प्रदर्शित केला. हा चित्रपट मुंबईतील ऑलिंपिया चित्रपटगृहात भारतीय जनतेसाठी प्रदर्शित होणारा हा पहिलाच चित्रपट ठरला.
१९३१

१९३१

    • 'आलम आरा' हा बोलपट मुंबई (तेव्हा बॉम्बे) येथील मॅजेस्टिक सिनेमागृहात पहिल्यांदा प्रदर्शित झाला. भारत हा चित्रनगरीच्या पहिल्या बोलपटाचा साक्षीदार ठरला.
१९३७

१९३७

    • भारतामध्ये बनवलेला पहिला स्वदेशी रंगीत चित्रपट 'किसान कन्या' प्रदर्शित झाला
१९७७

१९७७

    • कै. श्री व्ही. शांताराम, कै. श्री बी. आर. चोप्रा आणि कै.श्री दिलीप कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली, 'चित्रनगरी' ही महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ मर्यादित (MFSCDCL) या संस्थेच्या अंतर्गत २६ सप्टेंबर १९७७ रोजी कंपनी कायदा १९५६ अंतर्गत स्थापना करण्यात आली. कलागारे क्रमांक १ ते ७ पर्यंत उभारले.
१९९० – २०००

१९९० – २०००

    • कलागारे क्रमांक ८ ते १६ ची स्थापना करण्यात आली. एक स्वतंत्र कम्युनिकेशन सेंटर सुरू करण्यात आले आणि रिलायन्स मीडिया वर्क्स यांनी त्यांचा कलागारे स्थापन करून कार्य चालू केले.
२००१

२००१

    • चित्रनगरीचे नामांतर ‘दादासाहेब फाळके चित्रनगरी’ असे करण्यात आले.
२०१८

२०१८

    • महाराष्ट्र फिल्म सेल ची स्थापना MFSCDCL कडून करण्यात आली.
२०१९

२०१९

    • यूनेस्को ने मुंबईला ‘क्रिएटिव्ह सिटी ऑफ फिल्म्स’ म्हणून मान्यता दिली आणि महाराष्ट्रात चित्रिकरण परवान्यांसाठी एक खिडकी प्रणाली ची सुरूवात झाली.
कलागारे, बाह्य चित्रिकरण स्थळे बूकिंग आणि इतर चित्रिकरण सेवा